मुंबईत युवा क्रिकेटरची हत्या

    दिनांक :07-Jun-2019
मुंबई :
भांडुप येथील राकेश पवार या युवा क्रिकेटपटूची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास राकेशची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात लोकांनी धारदार शस्त्रांनी राकेशवर हल्ला केला. या भीषण हल्ल्यामध्ये राकेश गतप्राण झाला. दरम्यान, राकेश महावीर पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेला होता.
 

 
राकेश लहान युवा क्रिकेटपटू होताच, त्याचबरोबर तो लहान मुलांना प्रशिक्षणही देत होता. हल्ला झाला त्यावेळी राकेशसोबत एक मुलगी होती. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राकेश विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्यामुळे प्रेमसंबंधातून हत्या झाली असावी असा कयास लावला जात आहे.