उद्या लागणार दहावीचा निकाल

    दिनांक :07-Jun-2019
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत अफवा पसरल्या होत्या. आज अखेर बोर्डानं दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करत अफवांवरील पडदा उठवला आहे. बोर्डानं उद्या म्हणजेच आठ जून रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. उद्या दुपारी एक वाजाता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहाता येणार आहे. maharashtraeducation.com
mahresult.nic.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in.  या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
 

 
गेल्यावर्षाही दहावीचा निकाल ८ जून रोजी लागला होता. मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या निकालाच्या तारखांविषयी गेल्या आठवड्यापासून व्हॉट्सअॅपवर वेगवेगळे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र, आता बोर्डाकडून दाहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
 
असा पाहा निकाल –
वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.