आर्वी पोलिसांच्या वाहनाला अपघात; पोलीस निरीक्षकासह सहा जण जखमी

    दिनांक :07-Jun-2019
वर्धा: वर्ध्यातील आर्वी पोलीस स्टेशनच्या वाहनाला वर्धेला येत असताना अपघात झाला. हा अपघात आर्वी पुलंगाव मार्गावरील नांदोरा शिवारात पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडला आहे. वर्धेला शुक्रवारच्या परेडला हजर होण्यासाठी जात असताना वादळाने झाड पडलेले होते. यावेळी अचानकपणे वाहनाची धडक होण्यापासून वाचवत असतांना पलटी झाले. यात ७ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
शुक्रवारी पोलीस ग्राऊंडवर परेड आटपून आर्वीवरून विरुळ मार्गे वर्धेला होते. आर्वी खरांगणा वर्धा मार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे रसुलाबाद मार्गे वर्धेला जाताना अचानक नांदोरा शिवारात हा अपघात झाला. यात गाडीने पलटी खाल्ल्याने जबर मार लागला. यावेळी वाहन चालक समावेत ६ जण होते.
यात पोलीस निरीक्षक संपत चव्हाण हे जखमी झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खेडेकर, गोपाल ढोले यांच्यासह सहायक फौजदार रवींद्र राऊत, शिपाई सुरेंद्र कांदे हा सुद्धा जास्त जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सुनील मळनकर, अमोल बर्डे असे जखमींचे नाव आहेत.पीएसआय गोपाल ढोले हे गंभीर जखमी झाल्याने अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अन्य जखमींना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे.