मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या पातेल्यात बसून पूजा

    दिनांक :07-Jun-2019
बेंगळुरु
उन्हाच्या तीव्र झळांमुळे प्रत्येकजण त्रासलेला आहे. देशात मान्सून लवकर दाखल व्हावा आणि पावसाचं प्रमाण समाधानकारक असावं यासाठी होमहवन करण्यात आल्याचं आपण ऐकलं असेल. पण बेंगळुरुत दोन पुजारी मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या पातेल्यात बसले होते.
 
 
बेंगळुरूतील या दोन पुजाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोमेश्वर मंदिरातील दोन पुजारी मान्सून चांगला व्हावासाठी पाण्याने भरलेल्या पातेल्यात बसले आहेत. तर एक पुजारी होमहवन करत आहे. पातेल्यात बसून पुजारी मोबाइलवर अपडेट्स घेत असल्याचंही दिसतं. पूजा केल्यानंतर पुजारी पातेल्यात बसून मोबाइल अॅपमध्ये हवामानाची माहिती घेत होते, असं सांगितलं जात आहे.