टाकळी(झ) येथे वादळाचा प्रकोप

    दिनांक :07-Jun-2019
* अनेक घरांची पडझड
*विद्युत पोल, झाडेही कोसळले
सेलू : आज (ता 7) दुपारी झालेल्या अकाली पाऊस व वादळाच्या तडाख्यात तालुक्यातील टाकळी(झ) हे गाव सापडले यात 12 घरांचे छप्पर उडून संसारचं उघड्यावर आले, तर भिंती खाली दबून एका गाईचा मृत्यू झाला व एक मोटार सायकल क्षतीग्रस्त झाली.
आज दुपारी 2 च्या सुमारास झडशी परिसरात अचानक वादळासह पावसाची सुरवात झाली, सुरू असलेल्या वादळाने टाकळी(झ) या गावाला अचानक कवेत घेतले.
 

 
 
यात मारोती गेडाम यांचे घराचे छप्पर उडुन त्यांची गाय त्याखाली दबून मरण पावली,शामु शिवरकर,नारायण सावरकर, ज्ञानेश्वर पारटकर, प्रेमीला पाटील, भानुदास नगराळे, शेखर तेलरांधे, बालाजी दूधकोर ,व संजय डवरे यांचे घरावरील चप्परे उडून गेलीत.संकेत बारई यांच्या दुचाकीवर टिना कोसळून गाडी क्षतीग्रस्त झाली
परिसरातील झाडेही कोसळली तर विद्युत पोलंही जमीनदोस्त झाली
घटनेची माहिती होताच झडशीचे तलाठी सुदेश जाधव व सहाय्यक नितीन भांडेकर यांनी टाकळी गावाला भेट देत नुकसानीचा अहवाल तयार केला.