'तारक मेहता...'मधील दयाबेननं हे ठेवलं मुलीचं नाव; शेअर केला फोटो

    दिनांक :07-Jun-2019
'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दयाबेन अर्थात दिशा वकानी सध्या मालिकेपासून लांब आहे ते तिच्या मुलीमुळे. तिच्या मुलीचं नाव काय ठेवलं अशी उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. दिशानं तिच्या मुलीचं नाव स्तुती ठेवलं आहे. अलीकडेच तिनं स्तुतीचा एक गोड सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
 
 
दिशानं ३० नोव्हेंबर २०१७ ला मुंबईत या गोड परीला जन्म दिला. दिशाची मुलगी कशी दिसते हे पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. दिशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्तुतीचा फोटो शेअर केला आहे. दिशाच्या चाहत्यांनी हा फोटो पाहून स्तुतीचं कौतुक केलंय आणि 'तिचं असे वेगेवेगळे फोटो आमच्यासोबत शेअर करत राहा' अशी विनंतीही केली आहे.