अमिताभ बच्‍चन यांचे सेक्रेटरी शीतल जैन यांचे निधन

    दिनांक :08-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
मुंबई, 
बिग-बी अमिताभ बच्‍चन यांनी यशाच शिखर पादाक्रांत केलं. प्रत्‍येकाच्‍या नशीबात असं यश मिळत नाही. संपूर्ण जग त्‍यांच्‍या अभिनयाला सलाम करते. या महानायकाचा चित्रपटसृष्‍टीतील प्रवास पाहणारे आणि अनेक वर्षे अमिताभ यांचे सेक्रेटरी म्‍हणून काम पाहिलेले शीतल जैन यांचे निधन झाले.

 
शीतल जैन यांनी अमिताभ बच्‍चन यांच्‍यासोबत ३५ वर्षे काम केले. ज्‍यावेळी अमिताभ बच्‍चन यांनी आपले चित्रपट करिअर सुरू केले होते, त्‍यावेळी शीतल जैन त्‍यांच्‍यासोबत होते. तीन दशकाहून अधिक वेळ त्‍यांनी अमिताभ यांच्‍यासोबत घालवला.
 
 
त्‍यांच्‍या निधनावर महानायक अमिताभ बच्‍चन यांनी दु:ख व्‍यक्‍त केले आहे. तर अभिनेता अनुपम खेर यांनीही ट्‍विटरवर श्रद्धांजली दिली आहे. अनेक स्‍टार्सनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून दु:ख व्‍यक्‍त केले आहे.