'या' चित्रपटाच्या एका ॲक्‍शन सीक्‍वेन्‍सचा खर्च आहे ४५ कोटी

    दिनांक :08-Jun-2019
नवी दिल्‍ली,
'आरआरआर' हा बिग बजेट चित्रपट मोठ्‍या पडद्‍यावर येत आहे. तब्‍बल ४५ कोटी रुपये खर्चून या चित्रपटातील एक ॲक्‍शन सीक्वेन्‍स शूट करण्‍यात येणार आहे. इतक्‍या बजेटमध्‍ये निर्माते तीन चित्रपट बनवू शकत होते. मात्र, आरआरआरचे निर्माते हा बिग बजेट चित्रपट आणत आहे. एक सीक्वेन्‍स शूट करण्‍यासाठी इतकी मोठी रक्‍कम खर्च केली जात आहे, तर आपण या बिग प्रोजेक्टच्‍या बिग स्केलचे अंदाज सहज लावू शकतो.

 
या सीक्वेन्‍ससाठी हजारो फायटर्ससोबत जवळपास ६ महिन्‍यांपर्यंत प्री-व्‍हिज्‍युअलायझेशन आणि ट्रेनिंग सुरू आहे. चित्रपटाची खास तयारी पूर्ण झाल्‍यानंतर दिग्‍दर्शक या चित्रपटाच्‍या शूटिंगसाठी तयार झाले आहेत. सूत्रांच्‍या माहितीनुसार, हे सीक्वेन्‍स हैदराबादच्‍या एका ॲल्युमिनिअम फॅक्‍टरीमध्‍ये चित्रीत करण्‍यात आले आहे. सीनमध्‍ये काय होणार, याबाबत गोपनीयता बाळगण्‍यात आली आहे. त्‍या फॅक्ट्रीमध्‍ये नायिकेला सोडवण्‍यासाठी दोन हिरो येतात आणि खलनायक आणि त्‍यांच्‍या दोन हजार माणसांशी दोन हात करतात.
जुलैपर्यंत या सीक्वेन्‍सचे शूटिंग पूर्ण होईल, असे म्‍हटले जात आहे. याआधी चित्रटाच्‍या पहिल्‍या शेड्यूलमध्‍ये हैदराबाद येथील ॲल्युमिनियम फॅक्टरीमध्‍ये या चित्रपटातील काही भागाचे सीन चित्रीत करण्‍यात आले आहे. त्‍याचबराबेर, दिल्ली आणि पुण्‍यातही शूटिंग झाले आहे.
विशेष म्‍हणजे, हा चित्रपट १० हून अधिक भाषेत बनणार आहे. ३० जुलै, २०२० ला मोठ्‍या पडद्‍यावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.