दुबईतील बस अपघातात आठ भारतीय ठार

    दिनांक :08-Jun-2019

दुबई,
येथील एक पर्यटकांची बस एका साईन बोर्डाला धडकून झालेल्या अपघातात एकूण सतरा जण ठार झाले असून त्यात आठ भारतीय नागरीकांचा समावेश आहे. या अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत. ही बस ओमानची होती. ती बस एका चुकीच्या मार्गिकेत शिरली. तो मार्ग बस साठी नव्हता तो अन्य वाहनांसाठी राखीव होता. ही बस अल रशिदीया मेट्रो स्थानकाकडे चालली होती.
बस मध्ये एकूण 31 जण होते. त्या मार्गावर जो हाईट बॅरिअरचा आडवा खांब होता त्याला ही बस धडकली. त्यामुळे बसच्या डाव्या बाजुला बसलेले प्रवासी त्यातून चिरडले गेले. या घटनेची माहिती मिळताच भारतीय दूतावासाने मृत भारतीय प्रवाशांच्या नातेवाईकांना ही माहिती कळवून त्यांना तातडीची मदत देऊ केली. भारतीय दूतावासाचे अधिकारी पोलिस, आणि हॉस्पीटल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आहेत. तसेच मृतांच्या भारतातील नातेवाईकांशीही संपर्क साधला जात आहे.