प्रफुल पटेल यांच्या अडचणीत वाढ

    दिनांक :08-Jun-2019
नवी दिल्ली: माजी नागरी उड्डाण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. कारणअंमलबजावणी संचलनालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. या आधी मागच्या शनिवारी त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र ईडीसमोर ते हजर झाले नाहीत. आपल्याला पूर्व नियोजित कार्यक्रम आहेत असे कारण त्यावेळी त्यांनी दिले. त्यामुळे आता त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्याप्रकरणी एअर इंडिया संबंधित प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. हवाई वाहतूक घोटाळ्यात एअर इंडियाला झालेल्या नुकसानाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नागरी विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. आता ईडीने प्रफुल्ल पटेल यांना १० किंवा ११ जून रोजी हजर रहाण्यासंबंधी समन्स बजावले आहेत.