गोवा विमानतळ वाहतुकीस बंद; मिग २९ चा ड्रॉप टँक कोसळला

    दिनांक :08-Jun-2019
पणजी
गोवा विमानतळ काही तासांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. विमानतळावर 'मिग २९ के' या लढाऊ विमानाचा ड्रॉप टँक कोसळल्याने आग लागली. या अपघाताच्या कारणास्तव विमानतळावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली.

 
 
 
 
दाभोळी विमानतळाहून 'मिग २९ के' या लढाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ड्रॉप टँक अर्थात विमानापासून वेगळी होणारी इंधन टाकी कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये 'मिग २९ के' आणि वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
 
 
आगीवर नियंत्रण आणून लवकरात लवकर विमानतळ खुले करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले. गोवा विमानतळावरील वाहतूक दोन तासांसाठी बंद असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.