आता रेल्वेमध्ये मिळणार मसाज सर्व्हिस

    दिनांक :08-Jun-2019
नवी दिल्ली : यापुढे तासंतास रेल्वेचा प्रवास करतांना तुम्हाला थकवा आला अथवा अंग अखडले तर तुम्ही रेल्वे प्रवासा दरम्यानच मसाज घेऊ शकता. हो हे खरे आहे! आता धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना मसाज करुन घेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ही सुविधा खासकरुन इंदूरहून सुटणाऱ्या ३९ ट्रेनमध्ये असणार आहे.
 

 
 
रेल्वे प्रवाशांना मसाजची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाला दरवर्षी जवळपास २० लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो. तसेच, जवळपास ९० लाख रुपयांची अतिरिक्त तिकीट विक्री सुद्धा होऊ शकते, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.एन. सुनकर यांचे म्हणणे आहे.  या सेवेसाठी १०० रुपये प्रवाशाला मोजावे लागणार आहेत. तसेच, या व्यक्तींचे फोन नंबर टीटीई आणि कोचमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यावेळी गरज असेल, त्यावेळी प्रवासी फोन करुन मसाज करणाऱ्या व्यक्तीला बोलवू शकतो. प्रवासी या सेवेचा फायदा सकाळी सहा ते रात्री दहावाजेपर्यंत घेऊ शकणार आहेत.