आणि आनंदाच्या भरात रॉय पंचांना धडकला

    दिनांक :08-Jun-2019
कार्डिफ,
इंग्लंड आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या विश्वचषक सामन्यात इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने दमदार दीड शतक फटकावले. त्याने 121 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार आणि 5 षटकार खेचत 153 धावा केल्या. मात्र, या सर्वात मैदानावरील पंच सपशेल आडवे झाले.

 
जेसन रॉयने शतक फटकावल्यानंतर मैदानात एक गंमतीशीर प्रकार घडला. 27 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयने एक धाव घेत आपले नववे शतक पूर्ण केले.
 

 
 
चेंडू टोलवून धाव घेण्यासाठी पळत असताना त्याचे लक्ष चेंडूवर होते. ज्यावेळी तो नॉन स्ट्राईकला पोहोचला तेव्हा त्याने पंच जोल विल्सन यांना जोराची धडक दिली. यामध्ये पंच सपशेल आडवे झाले. यानंतर मैदानात आणि मैदानाबाहेर चांगलाच हशा पिकला.
 
पंच मैदानावर आडवे झाल्यानंतर रॉयने तत्परता दाखवत त्यांना हात दिला. मात्र, रॉयचा बेधडक शतकाचा आनंद पंच आणि मैदानावरील सर्वांच्या चांगलाच लक्षात राहणारा ठरला.