रात्रीस खेळ चाले... सैनिकांसाठी

    दिनांक :08-Jun-2019
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचा दुसरा सीझनही लोकप्रिय झाला. मालिकेत अण्णांची मग्रूर व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर यांनी एका गोष्टीसाठी घेतलेल्या पुढाकाराचं सध्या कौतुक होतंय. सध्या कोकणात याचं चित्रीकरण सुरू आहे.
 
 
 
अनेक पर्यटक ते पाहण्यासाठी सेटवर येत असतात. या गर्दीच्या मदतीनं देशाच्या सैनिकांसाठी काही करता आलं तर? अशी कल्पना अभ्यंकर यांना सुचली. त्यानंतर जानेवारीपासून त्यांनी सैनिकांच्या मदतीसाठी सेटवर एक ड्रॉप बॉक्स ठेवायला सुरुवात केली. हा एक बॉक्स पूर्ण भरला असून, आता दुसरा बॉक्स ठेवण्यात आला आहे