शरद पवार करणार फेसबुक लाइव्ह; देणार जनतेच्या प्रश्नांना उत्तर

    दिनांक :08-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम
मुंबई,
९ जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आहे. त्याच निमित्ताने पक्षाध्यक्ष शरद पवार ९ जून रोजी फेसबुक लाईव्ह करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ९ जूनला सकाळी ११ वाजता शरद पवार फेसबुकवर लाईव्ह असणार आहेत. यावेळी ते पक्षाच्या ध्येयधोरणाविषयी बोलण्याची शक्यता आहे. 

 
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचं काम करताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी ते समजावून घेणार आहेत. त्याचप्रमाणे या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांचे उत्तर शरद पवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इथून पुढच्या प्रचारात डिजीटल मीडियाचा अधिकाधिक वापर करण्याचा मानस आहे.
 ">
 
यापूर्वी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भोसरीत पार पडली होती. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष ‘शरद पवार’ देखील उपस्थित होते.बैठकीदरम्यान, लोकसभा निवडणुकीचा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणती खबरदारी घ्यायला हवी, कोणती रणनिती असेल, त्यादृष्टीने मोर्चेबांधणी कशी केली पाहिजे या बाबींवर चर्चा केली गेली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना ‘प्रचार कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून शिका’ असा सल्ला पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला होता.