शिक्षक पतीने पुरवली पत्नीला कॉपी

    दिनांक :08-Jun-2019
 
 नाशिक : नाशिक येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आहे. परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. डायटचे परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच त्यांनी महाविद्यालयांच्या आवारात पळ काढलाा. मात्र परीक्षा नियंत्रकांनी संबधित विद्यार्थीनीचा पेपर काढून घेतल्याची माहिती परीक्षा केंद्रप्रमुक आर.डी बच्छाव यांनी दिली आहे.
 
 

 
 
 
महर्षि शिंदे अध्यापक महाविद्यालात शुक्रवारी (दि.७) सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पेपर सुरु झाल्यानंतर एक व्यक्ती संबधित महिलेला कॉपी पुरवित असल्याचे येथील काही कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी हा प्रकार प्राचार्यांच्या लक्षात आणून दिला . यादरम्यान संशयिताला पकडून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.परंतु, केंद्र प्रमुखांना याघटनेची माहिती दिली जात असताना संशयिता परीक्षा केंद्रातून पळ काढाला. परीक्षार्थी महिलेला कॉपी पुरविणारा संशयित पेठच्या कोटंबी येथील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक असून परीक्षार्थी महिलेचा पती असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा नियंत्रकांनी परीक्षार्थी महिलेचा जप्त करण्याची कारवाई केली असून सबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणी केंद्र प्रमुख आर. डी. बच्छाव यांच्याशी संपर्क साधला असता वरच्या मजल्यावर असल्याने आपल्याला उशीरा या प्रकाराची माहिती मिळाल्याचे सांगत परीक्षार्थी महिलेवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, झालेल्या प्रकार परीक्षा नियंत्रकांसमोर घडल्यानंतरही झालेल्या गोंधळानंतर संशयिताला महाविद्यालयातून पळ काढण्याची संधी मिळाल्याने महाविद्यालयातील परीक्षा यंत्रणेविषयीच साशंकता निर्माण झाली आहे.