जेसीबी मशीनखाली दाबून २ मजुरांचा मृत्यू

    दिनांक :08-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम  
वर्धा,
आर्वी येथे रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. अशातच आज पहाटे ४ वाजत्याच्या सुमारास आंजी मोठी सुकळी बाई येथील मंगलमुर्ती कोटेक्स समोर मुरूम लेव्हलीगचे काम सुरू अचानक मजुरांच्या अंगावरून जेसीबी मशीन गेल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.  

 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज पहाटे काम सुरु असताना लेव्हल मशिन क्र. पीवाय ३२-१६८ जे ०३४२ या मशिनने मजुर विठ्ठल रामकृष्ण भुजाडे रा. खरागंणा हे साईड सांगणे व उजेड दाखवत होते. तर विलास महादेवराव दोंदीलकर रा. रामनगर, वर्धा हे त्यांच्या सोबत उभे होते. लेव्हलींग करताना अचानक मशिन दोघांच्याही अंगावरुन गेल्याने अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सेवाग्राम रूग्णालयात नेले असता विठ्ठल भुजाडे यांना मृत घोषीत केले तर विकास दोंदीलकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
 
या  अपघातानंतर मशिन चालक फरार झाला असून अपघाताची माहीती मिळताच खरागंणा पोलीस स्टेशन चे ठाणेदार संतोष शेगावकर व आंजी मोठी पोलीस चौकी चे प्रभारी संतोष कामडी यांनी पंचनामा करून गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.