बिहारमध्ये इन्सेफेलाईटिस आजाराने १९ मुलांचा मृत्यू

    दिनांक :09-Jun-2019
मुजफ्फरपूर,
बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसकेएमसीएच या रुग्णालयात 1५ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर खासगी रुग्णालयांमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
 
वृत्तसंस्थेशी बोलताना, एसकेएमसीएच मुजफ्फरपूरचे अधीक्षक डॉ. सुनील शाही यांनी शनिवारी रुग्णालयात इन्सेफेलाईटिस या आजाराने ग्रस्त असलेल्या 38 मुलांना दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच यातील 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते.
 
 
 
तसेच अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.