विमान प्रवास आणखी महागणार

    दिनांक :09-Jun-2019
नवी दिल्ली,
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या वतीने भारतीय प्रवाशासाठीच्या हवाई सुरक्षा शुल्कात १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे शुल्क १३० रुपयांवरून १५० रुपयांवर गेल्यामुळे विमान प्रवास आता आणखी महाग होणार आहे, अशी माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. 

 
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हेच शुल्क २२५.५२ रुपयांवरून (३.२५ अमेरिकी डॉलर) ३३६.५४ रुपयांवर (४.८५ अमेरिकी डॉलर) नेण्यात आले आहे. स्थानिक प्रवाशांकडून हेच शुल्क १५० रुपये दराने आकारले जाईल, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सात जूनच्या आदेशात म्हटले आहे. प्रवासी सेवा शुल्काऐवजी आता हवाई सुरक्षा शुल्क लागू करण्यात येणार आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार, हवाई सुरक्षा शुल्काचे हे दर १ जुलै २०१९ रोजी १२ वाजून एक मिनिटांनी लागू होतील आणि १३० रुपये प्रवासी सेवा शुल्काऐवजी आता १५० रुपये लागू करण्यात येतील.