भारत-बांगलादेशात पुढील आठवड्यापासून चर्चा

    दिनांक :09-Jun-2019
ढाका,
भारत आणि बांगलादेशादरम्यान सीमा सुरक्षा दलस्तरावरील चर्चेला पुढील आठवड्यात ढाका येथे सुरुवात होणार आहे. या चर्चेदरम्यान सीमेवरील गुन्ह्यांसंदर्भात विविध मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहेत. 

 
 
सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख आर. के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील दहा सदस्यांचे शिष्टमंडळ ११ जून रोजी बांगलादेशाला रवाना होईल. या शिष्टमंडळात केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अमली पदार्थांच्या वाहतुकीचा मुद्दा बैठकीत उपस्थित होईल.