वाघाच्या हल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबियाला खा. नेते यांची भेट

    दिनांक :09-Jun-2019
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या हटकर व गुरनुले कुटुंबियांची खासदार अशोक नेते यांनी भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले .
यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते. शिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे  एक महिला व ९ महिन्याच्या बाळाला वाघाने रात्रींच्या दरम्यान झोपेतच उचलून नेउन ठार केल्याची घटना ८ दिवसा पूर्वी घडली होती. या घटनेची चौकशी तातडीने करून मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत व वाघाचा बंदोबस्त करावा अशी सूचना खासदार अशोक नेते यांनी वन विभागाचे अधिकारी सिह यांना दिली आहे.