नागपुरात वर्दळीच्या ठिकाणी चोरली सोनसाखळी

    दिनांक :09-Jun-2019
 
 
 
 
नागपूर : भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी एका महिलेच्या गळ्यातली मंगळसूत्र चोरल्याची घटना नागपुरात घडली आहे.  महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वर्ध्यातील हिंगणघाटमधून नागपूरला कामानिमित्त आलेल्या ज्योत्स्ना भगत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक पोलीस तैनात असलेल्या गणेशपेठमधील मध्यवर्ती बसस्थानकासमोर तीनही चोर एकाच वाहनावरून आले आणि सगळ्यांसमोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी दोन चोरांना अटक केली असून तिसरा चोर फरार आहे.