पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही ? :चंद्रकांत खैरे

    दिनांक :09-Jun-2019
औरंगाबाद:  येथे  शिवसेनेच्या वर्धापन दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करीत असतांना चंद्रकांत खैरे कमालीचे भावूक झाले. पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही?, असा उद्विग्न सवाल खैरे यांनी केला.

 
 
 
ज्या माणसाने आई वडिलांचा छळ केला, लोकांचा खून केला, अगदी बायकोचाही हा माणूस छळ करतो, त्याला मदत केली हे आपण पाप केले असे म्हणत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर निशाणा साधला. तर खैरेंचा पराभव हा आमचा पराभव असून हा पराभव आमच्या जिव्हारी लागलाय. पुन्हा शहरावर भगवा फडकवणार असल्याचा संकल्प उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात घेतला.