World Cup 2019 : टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाला ३५३ धावांचे आव्हान

    दिनांक :09-Jun-2019
नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ३५२/४ एवढा स्कोअर केला. शिखर धवनने १०९ चेंडूत  ११७ धावांची खेळी केली. ओपनिंगला आलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये १२७ धावांची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा ७० चेंडूत ५७ धावा काढत बाद झाला.

 
 
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शिखर धवनने कर्णधार विराट कोहलीबरोबरही पार्टनरशीप केली. शिखर धवन  बाद झाल्यानंतरही टीम इंडियाने फटकेबाजी सुरूच ठेवली. विराट कोहली ७७ चेंडूत ८२ धावा काढून बाद झाला. तर हार्दिक पांड्याने २७ चेंडूत ४८ धावा काढल्या आणि धोनीला १४ चेंडूत २७ धावा काढण्यात यश आले. केएल राहुलने ३ चेंडूत नाबाद ११ रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याच बॉलरला चमकदार कामगिरी करता आली नाही. मार्कस स्टॉयनिसने ७ ओव्हरमध्ये ६२ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि नॅथन कुल्टर नाईलला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आले.