सामना पाहण्यासाठी विजय माल्ल्या स्टेडियममध्ये दाखल

    दिनांक :09-Jun-2019
ओव्हल : देशातल्या अनेक बँकांना कोट्यवधींचा चुना लावून लंडनमध्ये फरार झालेला माल्याने  भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाहण्यासाठी ओव्हल स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. सामना सुरु झाल्यावर विजय मल्ल्या स्टेडियमनमध्ये जाण्यासाठी हजर झाला. तेव्हा मैदानाबाहेर उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला घेरले. अजूनही विजय मल्ल्या लंडनमध्ये मौजमजा करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.