अमरावती न्यायालय परिसरात पेटली कार

    दिनांक :01-Jul-2019
तभा ऑनलाईन टीम 
अमरावती,
जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती. 

 
 
सत्र न्यायालयाच्या पार्किंगमध्ये ॲड. बाळासाहेब गंध यांची कार उभी होती. त्यांच्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे वकील आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने पार्किंगमधल्या इतर गाड्या दुसरीकडे हलवण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळात अग्मिशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीमुळे कार जळून खाक झाली.