कारंजा-दारव्हा मार्गावर क्रुझर गाडीचा अपघात

    दिनांक :01-Jul-2019
तभा ऑनलाईन टीम  
उंबडाॅबाजार,
दारव्हा येथून कारंजाकडे येणाऱ्या क्रुझर गाडीला कारंजाजवळील रेल्वे फाटका जवळ स्टिअरींग जाम झाल्यामुळे गाडी पलटी होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दिड वाजता च्या सुमारास घडली. 

 
 
सविस्तर असे की मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम कोठारी येथील कलीमभाई हे दारव्हा येथून क्रुझर क्रमांक एम. एच. १५ बी. एक्स. या गाडीने कारंजाकडे येत असताना कारंज्या जवळील रेल्वे फाटका अलीकडे गाडीचे स्टेअरींग जाम झाल्यामुळे गाडी पलटी होवून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 
 
 
सुदैवाने या क्रुझर मध्ये चालका व्यतिरिक्त एकही प्रवासी नव्हता .तसेच चालकाला सुध्दा या अपघातात काहीच दुखापत झाली नाही.