ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

    दिनांक :01-Jul-2019
चांदूर रेल्वे,
मद्यधूंद अवस्थेतल्या चालकाने भरधाव ट्रॅक्टरची पायदळ जाणार्‍या पितापुत्राला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वडीलाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. 1 जुलैला सायंकाळी रेल्वे स्टेशन रोडवर विश्रामगृहा जवळ ही घटना घडली. 

 
 
सुभाष महादेव हटवार असे मृत्यू झालेल्या वडीलांचे नाव आहे. चांदूर रेल्वेवरून 10 कि.मी. अंतरावरील सोनोरा (भिलटेक) येथील मुळचे रहिवासी व सध्या वर्धा येथे राहत असलेले सुभाष महादेव हटवार व मुलगा अनिकेत सुभाष हटवार हे दोघे चांदूर रेल्वे तहसील कार्यालय येथे उत्पन्नाचा दाखला व जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आले होते. येथील काम आटोपून पायदळ दोघे पितापुत्र रेल्वे स्टेशनकडे जात होते. ते रेल्वे स्टेशनवरून सायंकाळी 6.30 वाजताच्या जबलपुर एक्सप्रेसने वर्धेला जाणार होते. परंतु रस्त्यातच विश्रामगृहाजवळ मागून येणार्‍या भरधाव एमएच 27 एल 2731 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सुभाष हटवार यांना चिरडले.
 
यामध्ये सुभाष हटवार यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचा चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. यामध्ये सुदैवाने मुलगा अनिकेत हा बचावला. मद्यधुंद ट्रॅक्टर चालक आरोपी राहूल सुखदेवराव वाढोणकर ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पोबारा केला होता. या ट्रॅक्टर चालकाचा काही नागरीकांनी पाठलाग करून राजना गावातील रेल्वे पुलाखाली त्याला पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. चांदूर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून फिर्यादी हेमंत हटवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शंकर ढोले करीत आहे.