नागपूर मार्गावर भीषण अपघातात तिघे जखमी

    दिनांक :10-Jul-2019
वणी,
वणी वरून उपचारासाठी नागपूर येथे वृद्धाला घेऊन जात असलेल्या खाजगी रुग्णवाहिकेने नागपूर मार्गावर असलेल्या जाम या गावाजवळ उभ्या ट्रकला धडक दिल्याने वणी येथील तीन जण जखमी झाले आहेत. 

 
 
यवतमाळ मार्गावर असलेल्या जैताई मेडिकलचे मालक नरेश पिदूरकर वय 41 वर्ष यांचे वडील कृष्णाजी पिदूरकर वय 75 वर्ष हे खाली पडल्यामुळे त्यांच्या हात मोडला होता. त्यांना उपचार करिता नेण्यासाठी त्यांनी गेडाम यांची खाजगी रुग्णवाहिका क्र. एम एच 31 सि बी 3104 किरायाने करून वडिलांना घेऊन नागपूरला निघाले होते.
 
रुग्णवाहिका जाम या गावाजवळ पोहचताच रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रकला रुग्णवाहिकेने मागून धडक दिल्याने रुग्णवाहिकेचा चालक गेडाम, नरेश पिदूरकर, कृष्णाजी पिदूरकर हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारा करिता नागपूर येथे हलवले आहे. अपघाताची माहिती शहरात कळताच अनेकांनी नागपूरकडे धाव घेतली आहे.