लाच मागणारे सरपंच, रोजगार सेवक ACBच्या जाळ्यात

    दिनांक :10-Jul-2019
वाशीम,
पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेचे अनुदान काढुन देण्याच्या मागणीसाठी 3200 रुपये लाच मागून प्रत्यक्ष 200 रुपये स्वीकारल्या प्रकरणी मनभा ग्रापंचे सरपंच व रोजगार सेवक यांना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो च्या पथकाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.
  
 
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेमार्फत विहिर मंजूर असून, सदर विहिरीचे खोदकाम व बांधकामाकरिता शासनाकडून तिन लाख रूपये अनुदान मिळते. तक्रारदार यांना आतापर्यंत शासनाकडून 1 ला 91 हजार रूपये अनुदान मिळाले असून उर्वरित अनुदानाची रक्कम मिळणे बाकी आहे.
 
सदर अनुदानाची रक्कम काढणेकरिता सरपंच वहिदबेग सत्तारबेग मिर्झा यांनी कार्यकारी अभियंता अब्दुल सईद व इंजिनियर तायडे, लघु सिंचन विभाग,कारंजा यांचेकरिता 2 हजार रुपये लाचेची मागणी केली तसेच रोजगार सेवक शेख मुजिब शेख गुलाब याने विहीरीचे मस्टर काढण्याकरिता प्रत्येक मस्टरचे 200 रूपये प्रमाणे पैशाची पंचासमक्ष मागणी करून शेख मुजिब शेख गुलाब याने 200 रूपये रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. यामध्ये रोजगार सेवक शेख मुजिब यास ताब्यात घेण्यात आले असून सरपंच फरार आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.