राम कपूर झाला फॅट टू फिट

    दिनांक :10-Jul-2019
छोट्या पडद्यावर अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे राम कपूर. गुबगुबीत आणि हसमुख चेहऱ्याचा राम कपूर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून खऱ्या अर्थानं घराघरांत पोहोचला. मात्र, गेले काही दिवस तो टीव्हीच्या पडद्यावरून गायब होता. अलीकडंच त्यानं सोशल मीडियावर स्वत:चे काही फोटो अपलोड केले आहेत. हे फोटो त्याच्या चाहत्यांना चकीत करणारे आहेत. कारण, त्यात राम कपूरचा नवीन अवतार पाहायला मिळतोय.
 
 
राम कपूरने इन्स्टाग्रावर एक सेल्फी शेअर केला आणि त्याच्या या फोटोची चर्चा सुरू झाली. राम कपूरने गेल्या काही दिवसात वजन कमी करण्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या फोटोंवरून दिसून येते. रामचं वजन १३० किलोपर्यंत वाढलं होतं. त्यानंतर त्यानं वजन कमी करायचं ठरवलं. जीम आणि डाएट सुरू केल्यानंतर काही महिन्यातच त्यानं ३० किलो वजन घटवलं. ' ४५ वा वाढदिवस झाल्यानंतर मी वजन कमी करायचं ठरवलं होतं. वजन कमी करायचं तर पूर्णपणे त्यावर लक्ष केंद्रीत केल्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हाच मी ठाम केलं की कामातून ब्रेक घ्यायचा मग सहा महिने किंवा वर्ष गेलं तरीही चालेल' असं रामनं सांगितलं.
दिवसातून दोन तास व्यायाम आणि डाएट यात सातत्य ठेवल्यानं वजन कमी होण्यास मदत झाल्याचं राम सांगतो. 'वजन कमी करणं फक्त शारीरिक आव्हान नसतं तर आपण मानसिक तयारीही ठेवायला हवी. केवळ वजन कमी करण्यासाठी वर्षभर काम थांबवनं माझ्यासाठी सोपा निर्यण नव्हता. मात्र, कामा इतकच आरोग्य देखील म्हत्त्वाचं असल्यानं मी हा निर्णय घेतला' असं राम म्हणतो. राम नुकताच 'करले तू भी मोहोब्बत' या बेवसिरिजमध्ये झळकला होता. तसंच ' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लव्हयात्री' या चित्रपटात देखील त्याची महत्त्वाची भूमिका होती.