मिलिंद देवरा, डीके शिवकुमार मुंबई पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :10-Jul-2019
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या मनधरणीसाठी बंगळुरहून आलेले डीके शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा व नसीम खान यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांना कलिना गेस्ट हाऊसला पोलिसांनी नेले आहे.

 
कर्नाटकाती बंडखोर आमदार रनेसाँ हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. शिवकुमार यांच्यामुळे आमच्या जीवाल धोका असल्याचे बंडखोर आमादरांनी म्हटल्यानंतर रनेसान्स हॉटेल बाहेर शिवकुमार यांना पोलिसांनी अडवल्यानंतर गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर दुसरीकडे बंगळुराता गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेस नेत्यांना राजभवनजवळ निषेध करताना अटक करण्यात आली आहे.
 
 
 
मुंबईतील रेनेसान्स हॉटेल बाहेर काँग्रस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या सर्व घडमोडीची पोलिसांना कल्पना होती त्यामुळे हॉटेल परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनी या परिसरात संचार बंदी देखील लागू केली होती.