बालाघाट जिल्ह्यात दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

    दिनांक :10-Jul-2019
मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यात जवानांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. पोलिसांनी याबाबत बुधवारी माहिती दिली की ही चकमक बालाघाट जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ८० किलोमीटर दूर असलेल्या देवर बेली भागात झाली. या चकमकीत ठार झालेले दोन्ही नक्षली हे छत्तीसगडचे रहिवासी होते.
 
 
पोलिस महानिरीक्षक केपी व्यंकटेश्वर यांनी याबाबत सांगिते की, ठार करण्यात आलेल्या नक्षलींची ओळख मंजेश आणि नंद अशी आहे. यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांवर गोळीबार केला होता. ज्यास पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोघेही ठार झाले. मध्य प्रदेश व छत्तीसगड पोलिस अनेक दिवसांपासून या दोघांच्याही शोधात होते.