वर्ध्यात १४ किलो गांजा जप्त

    दिनांक :11-Jul-2019
वर्धा: सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरातून १४ किलोचा गांजा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांनी आज सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. असिफ खाँ अनिस खाँ असे आरोपीचे नाव आहे. वर्धा शहर पोलीसांना बाहेर राज्यातून गांजा तस्करीसाठी आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सेवाग्राम रेल्वेस्थानक परिसरात नाकेबंदी करण्यात आली. नाकेबंदी दरम्यान संशयिताला तपासण्यात आले. यावेळी त्याच्या हातातील एका मोठ्या बॅगमध्ये गांजा आढळून आला. त्याची चौकशी केली असता १३ किलो ८०० ग्राम गांजा सापडला. या गांज्यासह एक दुचाकी असा एकूण १ लाख ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंबंधीत पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश पारधी करीत आहेत.