CWC2019 : धोनी, जडेजा दबावातही चांगले खेळले - बोल्ट

    दिनांक :11-Jul-2019

मॅन्चेस्टर,
रवींद्र जडेजा आणि महेंद्रिंसह धोनी यांनी विश्वचषक कि‘केट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. दबाव असतानाही या दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी बजावली आणि दबावाप्रमाणेच आमच्या गोलंदाजीचाही समर्थ सामना केला, असे प्रतिपादन न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने केले आहे.
 

 
 
सामन्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बोल्ट म्हणाला की, धोनी आणि जडेजा जोपर्यंत खेळपट्टीवर होते तोपर्यंत आमचीही धाकधुक सुरू होती. कारण, हे दोघे काहीही करू शकत होते आणि सामन्याचे चित्रही पालटवू शकत होते.
 
विराट कोहली आणि रवींद्र जडेजाला महत्त्वपूर्ण सामन्यात बाद करणारा हा वेगवान गोलंदाज म्हणाला की, नवीन चेंडूमुळे आम्ही भारतीय संघामध्ये जी दहशत निर्माण केली त्याचा मी पुरेपूर आनंद घेतला. सुरुवातीच्या कामगिरीमुळे आमचा आत्मविश्वास दुणावला होता. आता आम्ही खूप उत्साहित आहोत. कारण, आम्हाला आता लॉडर्सवर अंतिम सामना खेळायचा आहे.