हिंगणघाटमध्ये पुन्हा घरफोडी

    दिनांक :11-Jul-2019
 चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान !
हिंगणघाट,
येथील यशवंत नगरातील नेताजी लाजुरकर यांच्या बंद असलेल्या घरुन काल मध्यरात्री चोरट्यांनी ७ हजार ५०० रुपये लंपास केले. मंगळवारी येथील गुरुनानक वार्डात घडलेली चोरीची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी घरफोडी करून पोलिसांनासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. लाजुरकर हे आपल्या कुटुंबासोबत एका विवाह निमित्य नागपूरला गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांना समोरच्या दाराचे कुलूप फोडून घरात प्रवेश घेतला. चोरट्यांनी घरात अक्षरशः धुमाकूळ घातला, सर्व सामान हुडकून काढले व मिळेल ती रक्कम घेऊन घराच्या दुसऱ्या बाजूच्या दाराने पळ काढला. पळ काढतांना चोरट्यांनी बाजूचे दार उघडे सोडले होते. आज सकाळी फिरायला जाणाऱ्या परिसरातील नागरिकांना त्यांच्या घराचे कुलूप तोडले असल्याचे आणि बाजूचे दार उघडे असल्याचे निदर्शनास आले,त्यांनी याची माहिती लाजुरकर यांना दिली .पोलिसांनी नेताजी लाजुरकर यांच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद केला आहे.