विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाची २१ जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

    दिनांक :11-Jul-2019
मुंबई : राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर 21 जुलै रोजी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल. मुंबतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडेल. या बैठकीत राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे.