राहुल गांधींचे टि्वटरवर १० दशलक्ष फॉलोअर्स

    दिनांक :11-Jul-2019
नवी दिल्ली,
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या टि्वटर फॉलोअर्सची संख्या बुधवारी १० दशलक्षांच्या वर गेली. या ‘मैलाचा दगड’ प्रतिसादाबद्दल गांधी यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना टि्वटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स (६.९ दशलक्ष) लाभले होते. आता राहुल गांधी यांनी त्यांना मागे टाकले आहे. मात्र, राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा बरेच मागे आहेत.
 
 
मोदी यांना टिष्ट्वटरवर ४८ दशलक्ष फालोअर्स आहेत. ‘१० दशलक्ष टि्वटर फॉलोअर्स- तुम्हा प्रत्येकाचे आभार’ असे गांधी यांनी टि्वटरवर म्हटले. हे यश मी अमेठीत साजरे करीन. तेथे मी आज काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पाठीराख्यांची भेट घेणार आहे,’ असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी १९९९ पासून अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.