शॉट सर्किटमुळे हॉटेलला आग

    दिनांक :11-Jul-2019
दोन लाखाचे नुकसान
कारंजा,
आज पहाटेच्या दरम्यान बस स्थानक बाजुला खरेदी विक्री कोम्प्लेक्स मधिल ईशान्त हॉटेलला शॉट सर्किट झाल्याने अचानक आग लागली हॉटेल मालक बाबू दर्यापूरकर हे सकाळी हॉटेल उघडण्यासाठी आले असता हॉटेल मधून धुर निघताना दिसत होता त्यामुळे त्यांनी दुकानाच शेटर उघडून आत असलेले सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. हॉटेलच्या बाजुला मोठे  किराणा दुकान होते सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठे नुकसान झाले असते. हॉटेल मधिल दोन फ्रिजर आणि अन्य साहित्य  जळाल्याने हॉटेल मालकाचे दोन लाखाचे नुकसान झाले.