जागतिक लोकसंख्या दिन; भारत होणार 'नंबर वन'

    दिनांक :11-Jul-2019
नवी दिल्ली,
आज जागतिक लोकसंख्या दिन. लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत आठ वर्षानंतर अव्वल क्रमांकावर येईल, असा दावा करण्यात आला आहे. लोकसंख्येत भारत २०२७ मध्ये चीनला मागे टाकून 'नंबर वन' होईल. त्यामुळे भारतातील लोकांना रोजगार, धान्य, पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
 
 
१९५१ साली भारताची लोकसंख्या ३६ कोटी होती. ती आजच्या घडीला १३३ कोटी इतकी झाली आहे. ११ जुलै १९८७ ला जागतिक लोकसंख्या ही ५०० कोटी इतकी होती. लोकसंख्या नियंत्रणात राहावी यासाठी जगभरात कार्यक्रम घेण्यात आले. १९८९ साली संयुक्त विकास कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरीबी, मातृ आरोग्य, मानव अधिकार या विषयांवर जनजागृती करण्यात आली.
'वॉटर अँड संस्थे'च्या अहवालानुसार, जागतिक जमिनीवरील एकूण पाण्याचा वापर भारतीय लोक २४ टक्के करतात. देशात ११७० मिमी टक्के पाऊस पडतो. परंतु, केवळ ६ टक्के पाणी जपून ठेवले जाते. पाण्याच्या प्रश्नावर भारतीय लोक गंभीर न झाल्यास त्यांना पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो. भारतातील ७५ टक्के घरात आजही स्वच्छ पाणी पोहोचले जात नाही, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.