सोनाक्षीवर फसवणुकीवरून गुन्हा

    दिनांक :12-Jul-2019
 
 
 
मुंबई,
उत्तरप्रदेशातील काटघर पोलिस ठाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सोनाक्षीने एका स्टेज शोसाठी आयोजकांकडून 24 लाख रुपये घेतले होते. मात्र, कार्यक्रम केला नव्हता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनाक्षीला ताब्यात घेण्यासाठी काल उत्तर प्रदेश पोलिस सोनाक्षीच्या मुंबईतील घरी पोहोचले, मात्र ती घरी नव्हती. फसवणूक केल्याप्रकरणी तिच्यावर भादंवि कलम 420 आणि 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.