आरोग्य व स्वच्छतेवर भर द्या

    दिनांक :12-Jul-2019
- पंतप्रधानांचा महिला खासदारांना सल्ला
नवी दिल्ली,
आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर द्या आणि कुपोषण पूर्णपणे नष्ट करण्यात आपले योगदान द्या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी भाजपाच्या महिला खासदारांना दिला.
 
 
 
पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या न्याहारी बैठकीत भाजपाच्या 30 महिला खासदार उपस्थित होत्या. विविध मुद्यांवर या खासदारांनी आपले विचार मांडले. पंतप्रधानांनीही ते काळजीपूर्वक ऐकले. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक महिला ही स्वत: एका संस्थेसारखी असते. ती स्वबळावर कुठलेही अशक्य काम शक्य करून दाखवत असते. एक महिला म्हणून त्यांच्यात आगळेच कौशल्य असते, मदत आणि सेवा हाच तिचा सर्वांत मोठा गुण असतो. आजची ही बैठक या शृंखलेतील पाचवी आहे. भाजपा खासदारांचे सात गट तयार करण्यात आले आहेत. यातील प्रत्येक गटांसोबत पंतप्रधान चर्चा करीत आहेत.