आषाढी निमीत्त शेगांवात भक्ताची गर्दी

    दिनांक :12-Jul-2019
येतो तुझ्या दर्शनाला
सारा संसार सोडुनी
विठु विठुचा गजर करतो
भक्ती तुझी करुनी
सुखी ठेव सर्वांना
एकच माझी तुला विनवणी
 
शेगाव:  पांडुरंगाचे दर्शन पंढरीला जाउन सुध्दा झाले नाही म्हणून नाराज होऊन बसलेल्या भक्ताला संत गजाननाने कंबरेवर हात ठेउन विठ्ठल दर्शन घडवले होते तेव्हा पासुन भक्त पांडुरंगाचे दर्शन संत गजानन माऊली च्या रुपात घेतात म्हणून गेल्या कित्तेक वर्षा पासुन आषाढीला भक्त संत नगरी शेगांवला गर्दि करतात.

 
 
तसेही संत गजाननाचे भक्त कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना भेटायला त्यांचे दर्शन घ्यायला येतातच आज तर आषाढी संपुर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेला जे पांडुरंगाला भेटायला पंढरीला जाऊ शकत नाहीत किंवा जे पांडुरंगाला संत गजाननाच्या रुपातच पुजतात अशा लाखो भक्तांनी आज गजाननमाऊलींचे दर्शन घेतले संत गजानन महाराज संस्थान शेगांवच्या वतीने दररोजच्या नित्यनियमा प्रमाणे सकाळी काकडा आरती अभिषेक दुपारी महाआरती झाली महाप्रसाद सकाळी 10ते रात्री 10पर्यंत आता नियमीत सुरुच असतो भक्तानी श्रींचे दर्शन शांततेत घ्यावे यासाठी दर्शनाची विशेष सुव्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली होती पश्चिम महाद्वारातुन बाहेर जाऊन लायब्ररी मागुन महाप्रसाद व उजवीकडुन श्रींचेक्षसमाधी दर्शन व श्रींचे मुखदर्शनाकरीता रांग लावली होती श्रीच्या समाधी दर्शनासाठी आज जवळपास 3तास पर्यंत वेळ लागला यामधे भक्तांना कोणताही त्रास होऊनये याचे चोख व्यवस्था संस्थानच्या वतीने घेण्यात आली होती दुपारी 2वा श्रीची पालखि विठ्ठलाचा रथ मेणा गज अश्व टाळकरी पताकाधारी वारकरी भक्त विश्वस्थमंडळ यांचे सह गांव परीक्रमेला निघाली मुख्य प्रवेशद्वारातून पालखि परत फिरुन जूने दत्तमंदिरासमोरून जुने महादेव मंदिर प्रगट स्थळ सितलामाता मंदिर गढी परीसर आठवडिबाजार बसस्थानक मुख्य रस्ता व परत संत गजानन महाराज मंदिरात सायंकाळी आली हा पालखि सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी भक्तांनी मंदिरपरीसरात गर्दि केली होती तेथे भजनी भारुड पाउली होऊन महा आरती झाली रात्री आषाढि निमीत्त ह भ प बाबुराव बुवा काळे यांचे दु 4ते 5प्रवचन आणि रात्री किर्तन झाले आज दिवसभर भक्तांची संत नगरीत येजा सुरु होती श्रीचे समाधी दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन भक्त अत्यंत प्रसन्न होऊन मार्गस्त होताना दिसत होते.