कमरगाव येथे महिलेची हत्या

    दिनांक :12-Jul-2019
संशयावरुन एकास अटक
 
गोरेगाव,
तालुक्यातील कमरगाव येथे आज सकाळच्या दरम्यान स्वाती योगेश राहांगडाले यांची हत्या करण्यात आली.
मृतक स्वाती राहांगडाले घराजवळील वाळीत हळद बियाणे लावण्याकरीता गेली होती त्यादरम्यान फावळा डोक्यावर मारुन हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मूतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी केटीएस गोंदिया येथे पाठविण्यात आले.  या संदर्भात मूतक स्वाती राहांगडाले यांचा भाऊ यांनी पोलीसात दिलेल्या माहितीनुसार मृतक स्वाती हिचे लग्न योगेश राहांगडाले वय याच्याशी  २०१३ मध्ये झाले होते त्यांना अपत्य नसल्याने त्यांच्यात सतत भांडण सुरू होते. त्यामुळे मृतक स्वाती राहांगडाले हिने २०१४ मध्ये आपल्या माहेरी चिचगाव येथे एक पत्र लिहून ठेवले आहे. त्यात मृतक स्वाती व पती योगेश राहांगडाले यांच्यात अपत्ये होत नाही यावरून वादावादी सुरु असल्याचे नमूद आहे. त्यानुसार पोलिसांनी मूतक स्वातीचे पती यास संशयावरुन अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दशुरकर करीत आहेत.