श्री भक्त मंडळ शेगांवच्या वतीने २५ क्विंटल उसळीचे वितरण

    दिनांक :12-Jul-2019
शेगाव,
संतांचे माहेरघर पंढरपुर आहे तर भक्तांचे माहेरघर संतनगरी शेगा़व आहे संत नगरीत आलेल्या भक्तांना माहेरी आल्याचा आनंद मिळावा असा प्रयत्न संत गजानन महाराज संस्थान शेगांवच्या वतीने होतो. त्याच भावनेने खारीचा वाटा उचलावा म्हणून काही संत नगरीतील भक्तांनी सुरू केलेल्या उसळ महाप्रसाद वितरणाला आज भव्य रुप प्राप्त झाले आहे.

 
 
 संत येती घरा तोची दिवाळी दसरा !!असे अभंगात सांगितले आहे तीच प्रथा कसोशीने पाळण्याचा प्रयत्न संत नगरीतील हे गजानन भक्त सातत्याने करण्याचा प्रयत्न करणात आषाढी निमीत्त उसळीचा महाप्रसाद देण्याची योजना गेले काही वर्ष सातत्याने सुरू आहे. लहुजी वस्ताद चौकात आलेल्या भक्तांना आग्रहपुर्वक हा प्रसाद देण्याचे काम होते. विशेष म्हणजे सर्व हेवेदावे राजकीय विरोध द्वेष भावना आपसी भांडण सर्व विसरुन सर्व जाती धर्माचे बंधुभगिनी या माहायज्ञात आपली सेवा देतात. अथक तिनचार दिवस ह्या महाउसळ वितरणचे नियोजन केल्या जाते यंदा उसळी सोबत दही देऊन प्रसादाची गोडी अधीक वाढवली २५ क्विंटलच्यावर उससळीचे वितरण करण्यात विविध विरोधी पक्षाचे पदाधीकारी कार्यकर्ते एकत्र येऊन हे नियोजन अत्यंत शिस्त बद्ध पद्धतीने करतात हिच संत नगरीची खरी ओळख आहे. संत नगरीचा विकासच शांततेत आहे गोडी गुलाबीने राहून आलेल्या भक्तांची यथोचीत सेवा करण्यातच संत नगरीची प्रगती आहे.