नवा ‘गोल्डमॅन’ अंगावर बाळगतो तब्बल ५ किलो सोनं

    दिनांक :12-Jul-2019
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी सोनं परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत पुण्यातील एक तरूण दीड कोटी रूपयांचं सोनं परिधान करत आहे. या तरूणाचे नाव प्रशांत सपकाळ असे आहे. सोशल मीडियावर त्याला गोल्डमॅन म्हणून ओळखलं जातं. तब्बल पाच किलो वजनाचे सोनं परिधान करून दररोज प्रशांत वावरताना दिसतात. प्रशांत यांना ऐवढं सोनं परिधान करण्याची प्रेरणा बप्पी लहरी यांच्याकडून लहानपणी मिळाली. सध्या बप्पी लहरीपेक्षा जास्त सोनं प्रशांत परिधान करतात.

पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात प्रशांत यांचा जन्म झाला. त्यानंतर प्रशांत यांनी स्वतचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रशांत सामाजिक कार्यातून गोरगरिबांना मदतही करतात. प्रशांत दररोज सोन्याची चैन, लॉकेट, ब्रेसलेटच्या स्वरूपात एकूण पाच किलो सोनं अंगावर परिधान करतात. प्रशांत यांना सोन्याची आवड आहे. स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशांत यांनी भरपूर कष्ट घेतले. सोशल मीडियावर प्रशांत यांचा चांगलाच बोलबाला असल्याचे पहायला मिळतोय.