सर्पदंशाने एकाच गावात वेगवेगळ्या ठिकाणी दोघाचा मृत्यु

    दिनांक :12-Jul-2019
ब्रम्हपुरी,
ब्रम्हपुरी तालुक्यातील पिपंळगाव भो येथे विषारी सापाने दंश केल्याने एक वृध्द महिला व एका शाळकरी मुलाचा मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पिपंळगाव भो येथील वृध्द महिला सिताबाई श्रीराम सोनवाने ही घरी तांदुळ काढत असताना तांदळाच्या डब्ब्याखाली दडी मारलेल्या विषारी सापाने दंश केला. तसेच दुस-या घटणेत बंर्टी प्रेमदास फुलबांधे हा घराबाजूला असलेल्या शेतात शौचास गेला असता शेतात असलेल्या विषारी सापाने त्याच्या हाताला दंंश केला. १५ ते २० मिनीटात एकाच गावात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटणेतील दोन्ही घटणेतील सर्पदंशीतांना ब्रम्हपुरी येथील ग्रामीन रुग्णालयात  उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी दोघानाही मृत्यु घोषीत केले. घटणेचा माहीती मिळताच भाजपाचे जेष्ठ नेते वसंत वारजूरकर, जि, प उपाध्यक्ष किष्णा सहारे, माजी पं, स, यासभापनी, रवि मेश्राम, जिल्हा परिषद सदस्या स्मीता पारघी, माजी प, स, सदस्य नरेन्द्रभाऊ दुपारे, प, स, उपसभापती विलास उरकुडे, यांना घटणैची माहीती मिळताच त्यांनी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाईकाना त्वरीत शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी केली.