मग मला अटक का करत नाही : दिग्विजय सिंह

    दिनांक :12-Jul-2019
पुणे, 
पोलिसांना वाटत असेल की, माझे अतिरेक्यांसोबत संबंध आहेत तर ते मला अटक का करत नाही असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी विचारला आहे. पुण्यात एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे मिळालेल्या चिठ्ठीत दिग्विजय सिंह यांचा क्रमांक आढळला होता. राज्यसभेच्या वेबसाईटवर माझा मोबाईल क्रमांक असल्याने तो कुणाकडेही असू शकतो अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली.  दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. 
 

 
 
साध्वी प्रज्ञा यांच्यावर निशाणा साधत त्यांनी भाजपाला लक्ष केले. यावेळी ते म्हणाले की, अतिरेकी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत असल्याचे सांगतात. ही कोणती लढाई आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली.