वरळी सी लिंकवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

    दिनांक :12-Jul-2019
मुंबई,
वांद्रे-वरळी सी-लिंकवर समुद्रात उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  पार्थ सोमाणी असे या तरुणाचे नाव सांगण्यात येत आहे. ही घटना दुपारी सव्वा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. हा तरुण टॅक्सीने प्रवास करत वांद्रे-वरळी सी-लिंकवर आला. त्याने टॅक्सी थांबवण्यास सांगितली आणि समुद्रात उडी घेतली. दरम्यान, तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सायंकाळी उशिरापर्यंत या तरुणाचा समुद्रात शोध घेत होते.
 
 
पार्थ एका सीए फर्ममध्ये नोकरी करत होता. तो मुलुंड येथील रहिवासी आहे. तो दुपारी वरळीकडून वांद्र्च्या दिशेने टॅक्सीने जात होता. अचानक त्याने मध्ये टॅक्सी थांबवायला सांगितली आणि टॅक्सीतून उतरत समुद्रात उडी घेतली.
तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 'ओहोटी असल्याने शोध घेणे फार अवघड नाही,' असे समुद्री शोध व बचाव केंद्राचे प्रमुख कमांडर टी आशिष यांनी सांगितले. मात्र तटरक्षक दलाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. सायंकाळी ६.१५ वाजता सूर्यास्त होत असल्याने शोध थांबवण्यात आला. उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होईल.