अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे स्‍वागत

    दिनांक :13-Jul-2019
चंद्रपूर, 
वृक्ष दिंडीच्‍या समारोप समारंभासाठी चंद्रपूर जिल्‍हा दौ-यावर आलेल्‍या ज्‍येष्‍ठ समाजसेविका, अनाथांची माई डॉ. सिंधुताई सपकाळ यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भेट घेतली. या भेटीदरम्‍यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबु पासून तयार करण्‍यात आलेला तिरंगा ध्‍वज व ग्रामगीता भेट देत सिंधुताईंचे स्‍वागत केले. तसेच ताडोबातील वाघिणीचे छायाचित्र सुध्‍दा यावेळी त्‍यांनी सिंधुताईंना भेट दिले. तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्‍याचा वनमंत्र्यांच्‍या निर्धाराचे व त्‍यात सुरू असलेल्‍या दमदार वाटचालीचे सिंधुताईंनी कौतुक केले व यावर्षीची 33 कोटी वृक्ष लागवडी मोहीम विक्रमी ठरावी यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.